Gauri Brahme

happy mothers day, kite, play-1666816.jpg

चाहूल

काल कितीतरी दिवसांनी आई भेटली. डॉक्टरांकडे जाणार म्हणाली होती म्हणून मी ही तिथेच गेले. या आया एक, धड काय होतंय ते नीट सांगत नाहीत. जीव टांगणीला लागतो मग. डॉक्टरांकडे पोचले तर वेटिंग रूममध्ये डोळे बंद करून, भिंतीला मागे डोक टेकून बसलेली दिसली. ही आपलीच आई का असा प्रश्न पडावा इतकी थकलेली दिसत होती. कसंसच झालं तिला पाहून. आई नेहमी हसरी, आनंदी दिसावी, आपण जसे तिला कायम पाहत आलो आहोत, कामात गढलेली, ओट्यापाशी गुणगुणणारी, निवांत पुस्तक वाचणारी, तशीच ती कायम दिसावी, जगात कसलीही उलथापालथ झाली तरी आईला काही होऊ नये, असं प्रत्येकालाच वाटतं असावं का?

,,काय होतंय ग?” विचारलं तर म्हणाली, “काही नाही, झोप झाली नाही रात्रभर, म्हणून थकवा असेल.” ती प्रयत्न करत बोलते. किती ही त्रास होत असो जगातल्या सगळ्या आयांची सुरुवात काही नाही ग पासून होत असावी. मी तिचे टेस्ट रिपोर्ट्स पाहायला घेते. जराश्या धाकधुकीतच उघडते. त्यातलं फारसं कळत नसलं तरी फार मोठी गडबड नसावी असं पेपर्स पाहून वाटतं. हिमोग्राम १६ पाहून मात्र मी उडते. ताण थोडासा हलका करायला तिला हसून विचारते, जेवणात फक्त खजूर आणि डाळींब घेतेस की काय? बाकी काहीच खात नाहीस? ती परत कसंनुसं हसते. त्रास होत असावा. सकाळपासून काही खाल्लंयस का? मी विचारते. ती मानेनेच नाही म्हणते. मग मात्र मला राहवत नाही. नंबर यायला वेळ असतो. नाही उत्तर येणार हे माहीत असूनही मी तिला खायला काही आणून देऊ का म्हणून विचारते. ती अजिबात नको म्हणते. मी हट्टाने थांब जरा म्हणत बाहेर पडते आणि तिच्या आवडीचं ताक घेऊन येते. घोटभर प्यायल्यावर तिला जरा हुशारी येते. नंबर येईपर्यंत तिला ताक पाज, तिची बॅग घे, तिचा मास्क ऍडजस्ट कर असलं काहीबाही मी करत राहते. माझ्या आईच्या म्हातारपणाची, (की लहानपणाची?!) चाहूल मला हळूहळू लागायला लागली असते.

डॉक्टर रिपोर्ट पाहून कावीळीचं निदान करतात. काळजी वाटली तरी इतर काहीही मोठं, अवघड झालेलं नाहीये हे ऐकून मला मनोमन बरंच वाटतं. लिहून दिलेली सगळी औषधं, काही फळं मी तिला आणून देते, कशी घ्यायची ते समजावते. तिला बाथरूमला नेऊन आणते. या आधी कधीही तिचा हात धरावा लागलेला नसतो. आता मात्र धरावा लागतो. कितीतरी दिवसांनी तिचा स्पर्श मला होतो. लहानपणी तिच्या पदराची गुंडाळी करून तिच्या पोटाच्या वळ्यांवरून हात फिरवणारी मी मला आठवते. तिचे हात किंचित रखरखीत झाले असले तरी त्यातली माया आटलेली नसते. स्पर्शांच्या आठवणी कठीण असतात! 

मी तिच्याकडे आणि तिने माझ्याकडे फार काळासाठी राहायला येणं शक्य नसल्याने मला तिला दवाखान्याच्या दारातच निरोप द्यावा लागतो. आता तिला बरीच हुशारी आलेली असते. या सगळ्या गडबडीत ती मला बिस्किटांचा एक पुडा हातात देते, तिच्या नातवंडांसाठी म्हणून घरून आठवणीने आणलेला. इतका त्रास होत असला तरी तिच्या सायीला ती कशी विसरेल? आपल्याला आपल्या आईसारखी आई होता नाही आलं तरी चालेल पण तिच्यासारखी आजी मात्र जरूर होता यावं असं मला वाटून जातं. 

“फक्त आराम करायचा आहेस.” बजावत मी तिला गाडीत बसवते. गाडी नजरेपासून फारशी लांब न जाताच मला धूसर दिसू लागते. प्रत्येक आईचं म्हातारपण दबक्या पावलांनी यावं आणि ते तितक्याच हलक्या पावलांनी निघूनही जावं अशी प्रार्थना मात्र मी मनोमन करते.

7 thoughts on “चाहूल”

  1. Keep up the fantastic work! Kalorifer Sobası odun, kömür, pelet gibi yakıtlarla çalışan ve ısıtma işlevi gören bir soba türüdür. Kalorifer Sobası içindeki yakıtın yanmasıyla oluşan ısıyı doğrudan çevresine yayar ve aynı zamanda suyun ısınmasını sağlar.

  2. I am really enjoying the theme/design of your blog. Do you ever run into any web browser compatibility issues? A small number of my blog audience have complained about my blog not operating correctly in Explorer but looks great in Firefox. Do you have any ideas to help fix this problem?

  3. What¦s Happening i am new to this, I stumbled upon this I have discovered It absolutely helpful and it has helped me out loads. I hope to give a contribution & help other customers like its aided me. Great job.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top