मेरे पास..
मागच्या सुट्टीत काही दिवस सलग सुट्टी मिळाल्यामुळे आमचे हे त्यांच्या इतर कुटुंबियांसोबत ट्रिपला गेले. मी कामात अडकले असल्यामुळे मला जाता आलं नाही. सुट्टीला एकत्र जाता येत नाहीये याचं वाईट वाटलंच पण आपलं मन तसं पहिल्यापासून मोठंच असल्याने ‘जा सिमरन, जी ले अपनी जिंदगी’ म्हणत गाडीत बसलेल्या नवऱ्याला मी अच्छा केलं. लेक त्यांच्याबरोबर गेली, मुलाला खूप आग्रह करूनही तो गेला नाही, तो इथे राहिला. परिस्थिती अशी कि एक मूल त्यांच्याकडे आणि एक मूल माझ्याकडे. मनात सहज विचार आला विभक्त कुटुंब काहीश्या अश्याच परिस्थितीतून जात असतात नाही का? कधी मुल एकाकडे तर कधी दुसऱ्याकडे. खरंतर मुलांना कायम दोन्ही पालक एकत्र हवे असतात पण प्रत्येक जोडप्याची कहाणी वेगळी असते त्यामुळे हे दरवेळी शक्य होतेच असे नाही. मागे एकदा आम्ही शाळेतले पालक एकत्र भेटलो होतो. त्यातल्या एका आईने तिची ओळख करून देताना ” मी अमुक चासकर पण माझ्या मुलाचे नाव अमुक पाटील आहे” असे स्पष्ट सांगितले होते. माझ्या मनात नंतर बराच काळ ते वाक्य रुंजी घालत होते.
रिसॉर्टवर पोचल्यापोचल्या फॅमिली ग्रुपवर फोटोंचा मारा सुरू केला. डोंगरांचे फोटो, स्विमिंग पूलचे फोटो, जंगलाचे फोटो, खादाडीचे फोटो, बाबाबरोबर निवांत बसलेले फोटो, वगैरे… तात्पर्य काय तर, ‘आम्ही इथे खूप मजा करतोय!’
तीन दिवस लेक ग्रुपवर अजिबात उत्तर न देता शांतपणे सगळे फोटो पाहत होता. तो सोबत न गेल्याचं दुःख त्याला होतंय की योग्य निर्णय घेऊन आईपाशी थांबल्याचा आनंद त्याला होतंय हे कळायला मार्ग नव्हता. सतरा अठरा वर्षाची पोरं अशीही फार विचारल्याशिवाय मनातलं पटकन काही सांगत नाहीत. दोघेच असलो तरी मी त्याच्या आवडीचा स्वयंपाक कर, आईस्क्रीम मागव, एकत्र एखादा सिनेमा बघ असं काहीबाही चालू होतं, जेणेकरून त्याला आपणही इथे मजाच करतोय असं वाटावं. तिसऱ्या दिवशी लेकीने ग्रुपवर फोटोंचा भडिमार केला, ‘इकडे मस्त मजा आहे, अजिबात गरम होत नाहीये, आज अमुक खाल्लं’ टाइप फोटो पाठवले. तीन दिवस एक शब्दही न बोलणाऱ्या आमच्या लेकाने मग फक्त एक गोष्ट केली. आम्हा दोघांचा एक सेल्फी ग्रुपवर पोस्ट केला आणि लिहिलं, ‘मेरे पास माँ है!’
Hi my family member! I wish to say that this post is amazing, great written and come with almost all important infos. I would like to look more posts like this .
BWER delivers robust, precision-engineered weighbridges to businesses across Iraq, combining state-of-the-art technology with local expertise to support infrastructure and logistics growth.
I have been surfing on-line greater than 3 hours nowadays, but I never discovered any fascinating article like yours. It is beautiful value enough for me. In my opinion, if all website owners and bloggers made just right content as you probably did, the net shall be much more useful than ever before.