Gauri Brahme

happy mothers day, kite, play-1666816.jpg

Mom fit Jeans

लेकीबरोबर जीन्स शॉपिंगला गेले होते. Straight fit, slim fit, skin fit, boot cut jeans, jeggings की जिगींस (मला अजूनही तो शब्द नीट कळला नाहीये) वगैरे प्रकार माहीत होते. काल एक नवीनच प्रकार समजला. मॉम फिट जीन्स. हा प्रकार मी बाजारात पहिल्यांदाच पाहिला. लेकीला विचारलं, हा कोणता नवीन पॅटर्न आहे? त्यावर ती म्हणते ही खास आईसाठी बनवलेली जीन्स आहे. आईसाठी म्हणजे? आया सगळ्या सारख्या नसतात ना. जगात शेकडो आया आहेत. एकच जीन्स सगळ्या आयांना कशी आवडेल किंवा छान दिसेल? 

त्यावर लेकीने दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. हे बघ आई, ही जीन्स ना धड टाईट ना खूप सैल आहे. एकदम खूप फॅशनेबल पण नाही आणि एकदम जुनाट पण नाही. त्याचा कट अगदी माफक पण एकदम छान आणि सगळ्यांना शोभेल असा आहे. सगळ्या साईजेस मध्ये मिळते. आईसाठी परफेक्ट. डिझाईनचं डोकं घेऊन आलेली लेक मला व्यवस्थित मॉम फीट जीन्समागचं विज्ञान समजावत होती. हा स्त्रीमनाला हेलावून टाकणारा नवीन मार्केटिंग प्रकार पाहून मनोमन मी मॉम फीट जीन्स मागच्या वैज्ञानिकाला नमस्कार केला. जरा गंमतीने लेकीला म्हणाले, पण हे काय बरोबर नाही. मॉम फीट जीन्स मिळते, मग Dad fit jeans नाही का मिळत? बाबा लोकांसाठी स्पेशल जीन्स नको? असा फरक का? लेक म्हणते, अग त्यांच्यासाठी अख्खं मार्केट असतं. कुठलीही जीन्स घ्यावी अन् घालावी. त्याने फार फरक पडत नाही. पण आया स्पेशल असतात ना? आणि रॉकस्टार आयांकडेच तर लोक बघतात ना!!

पॉइंट आहे राव!😅

3 thoughts on “Mom fit Jeans”

  1. Nice post. I learn something more challenging on different blogs everyday. It will always be stimulating to read content from other writers and practice a little something from their store. I’d prefer to use some with the content on my blog whether you don’t mind. Natually I’ll give you a link on your web blog. Thanks for sharing.

  2. I’ve been surfing online more than 3 hours today, yet I never found any interesting article like yours. It’s pretty worth enough for me. In my opinion, if all website owners and bloggers made good content as you did, the web will be much more useful than ever before.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top