Gauri Brahme

Quantico…एक अनुभव

क्वांटिको – खिळवून टाकणारी  रहस्यकथा

जर्मनीमध्ये पश्चिमेला मोझेल नावाची एक नदी आहे. या नदीची खासियत म्हणजे वाहता वाहता ती एक झोकदार वळण घेते आणि एखाद्या जमिनीच्या तुकड्याला विळखा घालून एक बेट तयार करेल की काय  असे वाटत असतानाच ती परत तिच्या उलट्या बाजुला वळते. उलट्या बाजुलाही ती परत तेच करते. वरुन पाहिले तर, ही मोझेल नदी अतिशय सुंदर अशी नागमोडी दिसते आणि डोळ्याचे पारणे फेडते. क्वांटिको ही टेलेव्हिजन सिरीज पाहताना या मोझेलची आठवण आल्याखेरीज राहत नाही. एका रहस्याची उकल होते आहे न आहे  असे वाटत असतानाच दुसरे रहस्य पुढे येऊन उभे ठाकते. एक भाग संपतो न संपतो तोवर दुसऱ्या भागात ही कथा कोणते वळण घेणार याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाते.

क्वांटिको या अमेरिकन टेलेव्हिजन सिरीजचा बावीस भागांचा पहिला सिझन सप्टेंबर २०१५ मध्ये अमेरिकतल्या ABC (American Broadcasting Company) या चॅनेलवर प्रक्षेपित केला गेला. पहिलाच सिझन अतिशय लोकप्रिय झाला. सिरीजला दहा पैकी सात रेटिंग मिळाले. व्हर्जिनिया येथील क्वांटिको येथे एफ.बी.आय अकॅडेमी ही हेरगिरी शिकवणारी अमेरिकन संघटना, त्यात नव्याने भरती झालेले विद्यार्थी, त्यांचे गुण, त्यांचे दोष, त्यांची परस्परातील फुलत जाणारी नाती, एकमेकांवर सतत कुरघोडी करण्याचे प्रयत्न, त्यांचे शिक्षक, प्रत्येकाचं वर्तमान, त्यांचा भूतकाळ आणि त्यांच्यासमोर सतत उभी ठाकणारी संकटं  यांची अतिशय वेगवान रितीने घातली गेलेली सांगड म्हणजे क्वांटिको! एफ.बी.आय एजंट होणे हे सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. नुसतीच शारीरिक नव्हे तर मानसिक व बौद्धीक पातळीवर देखील प्रत्येकाची कसोटी लागत असते. ट्रेनिंग घेणारे  क्वांटिको मधील विद्यार्थी महत्वाकांक्षी तर आहेतच पण त्याच बरोबर प्रचंड मेहनतीही आहेत. त्यांचं प्रशिक्षण अतिशय खडतर आहे. सिरीजच्या प्रत्येक भागात त्यांना एक कामगिरी दिली जाते. कधी ही कामगिरी फत्ते होते, कधी त्यांच्यावरच उलटते तर कधी साफ निष्फळ ठरते. असे असले तरी हे प्रशिक्षणार्थी या सगळ्यातून शिकत रहातात, प्रगती करत रहातात.    

क्वांटिको एफ.बी.आय ट्रेनिंग मध्ये भरती होण्याचं प्रत्येक विद्यार्थ्याचं कारण वेगळ आहे. एकाला आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायचा आहे, एकाला आपल्या घरच्यांसमोर स्वतःला सिद्ध करायचे आहे, एक चक्क स्वतः एफबीआय एजंट असून देखील ट्रेनी म्हणून विद्यार्थ्यामध्ये माहिती काढण्याकरता वावरतो आहे तर एकाला अमेरिकेला आणि पर्यायाने जगाला दहशतवादापासून वाचवायचे आहे. त्यांच्या शिक्षकांचीही स्वतःची वेगळी अशी कहाणी आहे. प्रत्येक भागात यांच्याबद्दल अधिकाधिक माहिती आपल्याला मिळत जाते. चुकीच्या गोष्टींविरुद्ध, अन्यायाविरुद्ध, दहशतवादाविरुद्ध लढणे हे सोपे काम नाही पण योग्य ते कौशल्य वापरुन, आपली बुद्धी वापरुन या गोष्टींचा सामना कसा करायचा हे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी हे शिक्षक आपले सर्वस्व पणाला लावतात. याच कौशल्याचा पुढे त्यांच्याच विरोधात कसा वापर होतो हे पाहणेही मनोरंजक आहे.

क्वांटिको मधील मुख्य प्रशिक्षणार्थी आणि सिरीजमधील मुख्य पात्र आहेत रायन बूथ, शेल्बी वायट, निमाह व रेना या जुळ्या बहिणी, केलब, सायमन, डीयाना आणि अलेक्स पॅरीश. त्यांचे शिक्षक मिरांडा व लियाम हे त्यांच्या प्रशिक्षणात आणि पर्यायाने या सिरीजमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात. या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक वेळी जबरदस्त स्पर्धा असते, मग ती शारीरिक पातळीवर असो किंवा बौद्धिक. कुठल्याही स्पर्धेत ते एकमेकांना अजिबात भिक घालत नाहीत, ते गरजेचेच असते, पण एकदा  प्रशिक्षणाची  वेळे संपली कि मग मात्र ते एकमेकांचे घट्ट मित्र म्हणून वावरतात. कधी रागाने एकमेकांच्या जीवावर उठतात तर कधी एकमेकांचा जीव वाचवण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. यांच्यात फुलत जाणारे भावबंध, मैत्री, नाराजी, विश्रांतीच्या, प्रेमाच्या चार क्षणांसाठी आसुललेलेपण पहाताना सैनिकी प्रशिक्षण घेताना कोणत्या प्रकारची कसोटी लागत असेल याची प्रचीती येत रहाते. यातली निमाह आणि रेना या अफगाणी जुळ्या मुलींची पात्रं विशेष लक्षवेधी आहेत. कामगिरीसाठी त्यांची सततची अदलाबदल अत्यंत परिणामकारक दाखवली गेली आहे.  एफ.बी.आयच्या या अत्यंत कठीण अश्या प्रशिक्षणात स्त्रिया आणि पुरुष  यांच्यात कुठलाही भेदभाव केला जात नाही ही यातील अजून एक विशेष बाब. धावायची स्पर्धा असो, अथवा बॉक्सिंगची मॅच किंवा नकाश्यावरून टार्गेट शोधण्याची कामगिरी, सर्व सराव हे सगळेजण एकत्र करतात. कथानकाच्या गरजेसाठीही हे बदल असू शकतात. पण त्यामुळे यांचं ट्रेनिंग पहाणे हा एक उत्कंठावर्धक भाग होऊन बसतो. 

अॅलेक्स पॅरिश या सिरीजमधले प्रमुख पात्र. अॅलेक्स एक अत्यंत महत्वाकांक्षी मुलगी आहे. तिच्या वडिलांप्रमाणे एक उत्तम  एजंट बनायचे स्वप्न ती दिवसरात्र पहात असते आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याकरता कुठेही मागेपुढे पहात नाही. तिची बुद्धीमत्तेची चुणूक, मैत्रीपूर्ण वागणूक (याला तिची  भारतीय पार्श्वभूमी कारणीभूत आहेच), कसून मेहनत घेण्याची तयारी या गुणांमुळे  वर्गात तिचे स्थान  कायम सर्वोत्तम असते. पण तिची हीच बुद्धिमत्ता पुढे तिचा शत्रू बनते. अॅलेक्सला ग्रांड सेन्ट्रल टर्मिनलच्या एका स्फोटात मुद्दाम गोवल जातं आणि मग सुरु होतो सत्याचा पाठलाग आणि त्यामागच्या षडयंत्राचा आणि खऱ्या सूत्रधाराचा शोध. हा शोध अतिशय उत्कंठावर्धक आणि अंगावर काटा आणणारा आहे.         

पहिल्या सिझन मध्ये दिग्दर्शकाने कथेची मांडणी करताना फ्लॅशबक तंत्राचा वापर अगदी कसबाने केला आहे. अॅलेक्सच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, संकटाचे मूळ  या फ्लॅशबक मध्ये प्रेक्षकांना मिळत जाते. नंतर मात्र हळूहळू  कथा एका सरळ रेषेत येते आणि रहस्याची उकल एक एक करून व्हायला लागते. आत्तापर्यंत चांगले वाटणारे लोक अचानक खलनायक म्हणून समोर येऊ लागतात. प्रत्येकाची “डार्क साईड” दिसू लागते. अॅलेक्सची या सगळ्याशी लढताना दमछाक होते. तिचे मित्र, तिचे सहकारी तिचे शत्रू बनतात आणि ती एकटी पडते. पण तरीही सत्याचा शोध घ्यायचं ती सोडत नाही. तिच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर आणि साहसी बाण्याने ती कौश्ल्याने या सगळ्या अडचणींशी मुकाबला करते. तिला नवनवीन माहिती कळत जाते आणि अनेक रहस्यांची उकल होत जाते.

सिरीज मध्ये ९/११ चा सततचा नामोल्लेख अमेरिकेला दहशतवादाने कसे सर्व स्तरांवर पछाडले आहे याची जाणीव करून देते.   

आता या सिरीजच्या यूएसपी कडे येऊ. तो म्हणजे यातले कलाकार. प्रियांका चोप्राचे नाव घेतल्याशिवाय क्वांटिकोबद्दल पुढे लिहिले जाऊच शकत नाही. मी अनेक दिवस क्वांटिकोबद्दल ऐकून होते. पूर्वानुभवामुळे एका बॉलीवूड अभिनेत्रीला नक्की कोणत्या प्रकारे या सिरीजमध्ये सादर केलं गेलं असेल याबद्दल मनात किंचित कुशंका होती. पण प्रियांका चोप्रा तोडीस तोड निघते. तिने अॅलेक्सचे पात्र खूप मेहनतीने साकारले आहे. शारीरिक कष्ट तर तिने घेतले आहेतच पण त्याच बरोबर बोलण्याची लकब, अॅक्सेंट, बॉडी लॅँग्वेज यावर ही भरपूर काम केले आहे. पूर्ण सिरीज मध्ये ती अत्यंत आत्मविश्वासाने वावरते, झोकून देऊन काम करते. तिची भारतीय ओळख ही तिच्यासाठी अडचण न बनता उलट सिरीजचा सेलिंग पॉइंट बनते. हॉलीवूड मध्ये फक्त मेहनतीच्या बळावर स्वतःला सिद्ध करणाऱ्या आणि घट्ट पाय रोवणाऱ्या या भारतीय नायिकेबद्दल आपल्याला अभिमान वाटायलाच हवा, मग वैयक्तिकरित्या ती आपली आवडती अभिनेत्री असो वा नसो. तिला मिळालेले पीपल्स चॉइस अवॉर्डही यावर शिक्कामार्तोब करते. बाकीचे सहकलाकार जेक मक्लोलीन, यास्मिन मसारी, जॉश हॉपकिन्स, जोहाना ब्रॅडी तिला योग्य ती साथ देतात. या सिरीजबद्दल असे म्हणले जाते की यातली सगळीच पात्र “सुंदर” या निकषावर निवडली गेली आहेत. त्यामुळे डोळ्यांना ही सिरीज “सुखावह” ठरतेच पण असे असले तरी अभिनयातही ही मंडळी कुठेच कमी पडत नाहीत.

दहशतवादाविरोधातली लढाई व त्यात सरस ठरणारी अमेरीका हे सध्याचं चलनी नाण असल्याने या सिरीजला मिळणार लक्षवेधक यश ही आश्चर्याची बाब नाही, त्याचा तिसरा सिझनही लवकरच येऊ घातला आहे. वेगवान रहस्यकथा पाहण्याची ज्यांना आवड असेल त्यांच्यासाठी ही सिरीज म्हणजे एक मेजवानी आहे. क्वांटिको सध्या स्टार वर्ल्ड व नेटफ्लीक्सवरही पहायला मिळते आहे. 

गौरी ब्रह्मे

10 thoughts on “Quantico…एक अनुभव”

  1. Manjiri Deshpande

    तुझी कल्पकता,कसब,लिखाण शैली निश्चितच वाखाणण्यासारखी आहे.तुझ साधेपण ,निर्व्याज हसू एकंदरीतच व्यक्तिमत्त्व प्रसन्न👌😊

  2. Hi there! This post couldn’t be written any better! Reading through this post reminds me of my previous room mate! He always kept talking about this. I will forward this article to him. Pretty sure he will have a good read. Thank you for sharing!

  3. Aw, this was a very nice post. In concept I wish to put in writing like this additionally – taking time and precise effort to make an excellent article… however what can I say… I procrastinate alot and in no way appear to get something done.

  4. Im not positive where you’re getting your info, but good topic. I must spend some time studying much more or understanding more. Thanks for fantastic information I was looking for this info for my mission.

  5. I feel that is among the so much vital info for me. And i am satisfied reading your article. But should remark on few basic issues, The website style is great, the articles is truly excellent : D. Good task, cheers

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top